माझे नकाशे

महाविद्यालयात मी QGIS नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करायला शिकलो. गंमत म्हणून मी पूर्वी काही नकाशेही बनवले, पण त्यांचं काय करावं ते कळलं नाही. आता असे नकाशे मुद्दाम बनवून इथे ठेवून देणार. 

भारतीय रेल्वे, मुंबई मंडळ, उपनगरीय रेल्वे सेवा

भारतीय रेल्वे, मुंबई मंडळ, उपनगरीय रेल्वे सेवा

मुंबईकर रोज लोकलने प्रवास करतो. डहाणू रोड, कसारा, कर्जत, खोपोली, पनवेल इतक्या लांबून लोकं मुंबईत येतात. ही ठिकाणं आपल्याला माहित असतात पण चर्चगेट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ही ठिकाणं नक्की किती लांब आहेत याचा अंदाजच नसतो. तो येण्यासाठी काढलेलं हे मुंबई मंडळाच्या उपनगरीय सेवेचं मानचित्र!

भारतातील साखरेचे उत्पादन

भारतातील साखर उत्पादक राज्य